मासे पकडायला गेले अन् ते परतलेच नाहीत ; तिघांवर काळाने घातला घाला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- नदीमध्ये मासोळ्या पकडण्यासाठी टाकलेलं जाळे काढण्यासाठी गेलेले तिन मच्छिमार पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या पिंगळाई नदीमध्ये तारखेड येथे घडली आहे.
यापैकी सायंकाळपर्यंत दोघांचे मृतदेह सापडले तर एका तरुणाचा शोध सुरू आहे. पंकज मेश्राम वय १९ वर्ष व अनिकेत मेश्राम वय १८ वर्ष या दोघांचे मृतदेह सापडले असून, बाळू नांदने वय २६ वर्ष या मच्छिमाराचा शोध नदीपात्रात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही युवक मच्छीमार पिंगळाई नदीत मासोळ्या पकडण्यासाठी टाकलेले जाळे काढण्यासाठी गेले असता त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. हे तीनही मच्छीमार तिवसा तालुक्यातील तारखेड येथील रहिवासी आहेत.
दरम्यान, हे मच्छिमार बुडाल्याची माहिती मिळताच जिल्हा शोध व बचाव पथकाने रेस्क्यू करून तीन तासातचं दोघांचे मृतदेह काही अंतरावर शोधून काढले. मात्र, बाळू नांदने याचा शोध लागला नसून रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवली उद्या सकाळी बाळूचा मृतदेह शोधण्यात येणार आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…