पुसद एसडीओ डॉ.राठोड यांच्या सुलतानी कारभारामुळे शेतकरी हतबल ; या प्रकरणात दोन अहवाल का..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे ९३७०४६४८२४
दिग्रस :- पुसद उपविभागीय महसूल अधिकाऱ्याच्या सुलतानी कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने पुसद उपविभागीय अधिकारी डॉ.व्येकट राठोड यांच्या सुलतानी कारभाराला जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून लगाम लावणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना सुसंगत कसा मिळेल यावर कटाक्ष ठेवण्याची अपेक्षा शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे.
नुकत्याच काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या सातबारावर असणाऱ्या क्षेत्रापैकी वर्ग 1 मधील शेत जमिनीचे पोटखराब क्षेत्र दुरुस्त करण्याचे शासनाकडून परिपत्रक काढण्यात आले होते. त्या शासन परिपत्रकानुसार मौजा तुपाटकळी येथील देवराव सखाराम वंझाळ शेत सर्वे न. 90 यांनी परिशिष्ट 3 मध्ये तलाठी यांचे कडे अर्ज दाखल करून पोटखराब क्षेत्र दुरुस्त करण्याकरीता तुपाटकळी येथील तलाठी यांचे कडे अर्ज करण्यात आला असता तलाठी यांनी त्यांचे कर्तव्य चोक पने बजावून स्थळ निरीक्षण करून व नकाशा अहवाल मंडळ अधिकारी यांच्याकडे सादर केला त्यावरून तुपटाकळी मंडळ अधिकारी यांनी तोच अहवाल तहसीलदार दिग्रस यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यावरून तहसीलदार दिग्रस यांनी सदर सर्वे नंबरच्या नकाशा वरून व भूमी अभिलेखावरून गाव नमुना सातबारावर दर्शविलेले पोट खराब वर्ग अ खात्री करून व पाहणी करून प्रपत्र अ मध्ये दुरुस्ती व आकारणी ठरवून अहवाल परिशिष्ट सात मध्ये सादर करण्यासाठी भूमी अभिलेख यांना पत्र देण्यात आले. त्यावरून उपाधीक्षक भूमी अभिलेख यांनी दिलेल्या गावाचे पोटखराबाचे संयुक्त पाहणे करून पोट खराब दुरुस्ती करण्यास हरकत नाही. अशा असल्याचा अहवाल तहसीलदार दिग्रस यांच्याकडे सादर केल्याने त्यामध्ये 0.35 हेक्टर आर पैकी मोजणी शीट क्रमांक प्रथम नुसार देवराव सखाराम वांजाळ यांचे सातबारा प्रमाणे 1.80 हेक्टर आर असून वहीतीप्रमाणे 1.78 आर आहे तर विजय अंडरस्कर,रमेश अंडरस्कर यांची सातबारा प्रमाणे क्षेत्र 3.0 हेक्टर आर वैतीप्रमाणे 2.76 हेक्टर व पोट खराब 0.25 हेक्टर एकूण पोट खराब क्षेत्र 0.27 आर असून 0.08 हेक्टर आर पोट खराब क्षेत्र वयती मध्ये आल्याचे अहवालात दिसून येत असल्यामुळे तहसीलदार दिग्रस यांनी पोट खराब वर्ग मधील क्षेत्र लागवडीखाली आणलेले त्यास आकारणी करून सातबारावर दुरुस्ती करणे मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पुसद यांचेकडे अहवाल सादर केल्यावरून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तत्कालीन उपविभागीय अधिकारी पुसद यांनी परिशिष्ट नऊ नुसार दुरुस्तीचे आदेश देण्यात पारित केले. त्याप्रमाणे तुपटाकळी तलाठी यांनी फेरफार क्रमांक 1665 फेरफार च्या नोंदी आदेशाप्रमाणे केल्या व मंडळ अधिकाऱ्यांनी फेरफार मंजूर करण्यात आले.
या प्रकरणात उपविभागीय अधिकारी पुसद यांच्याकडे पुनर्विलोकन दाखल झाले असता प्रभारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत फक्त मंडळ अधिकाऱ्यांना शौकाज बजावून तात्कालिक सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या आदेशाला पायदळणी तुडवत प्रभारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सुलतानी कारभार मुळे शेतकऱ्यांना मनस्ताप देत असल्याने या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकाऱ्यांयानी लक्ष देऊन प्रभारी उपविभागीय महसूल अधिकाऱ्याच्या सुलतानी कारभारातुन शेतकऱ्यांना सुसंगत न्याय मिळण्याची अपेक्षाच शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…