मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा टीकास्त्र ; आधीच्या सरकारने प्रतिसाद न दिल्यामुळे प्रकल्प गेला पराराज्यात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या दीड- दोन वर्षांत आवश्यक प्रतिसाद न मिळाल्याने वेदान्त – फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय कंपनीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातच घेतला होता, असा आरोप करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले.
आमचे सरकार येऊन दोनच महिने झाले आहेत. तरी आम्ही या प्रकल्पाबाबत तातडीने बैठक घेतली व नियमित संपर्कात होतो. कंपनीला अनुदान देण्याचे मान्य केले. मात्र आमचे सरकार येण्याच्या कितीतरी महिने आधी हा प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय या कंपनीने घेतला होता, तसे ट्विटही कंपनीचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांनी केले होते, असे शिंदे यांनी नमूद केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंपनीला जो प्रतिसाद व सहकार्य मिळायला हवे होते ते न मिळाल्याने कंपनीने गुजरातला जाण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे सांगितले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…