माजी मंत्री माणिकराव गावित यांचे अल्पशा आजाराने निधन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नंदुरबार :- माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. ते 88 वर्षांचे होते. माणिकराव गावित नंदुरबारमधून सलग नऊ वेळा खासदार राहिले होते.
ते कार्यकर्त्यांमध्ये ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे.

गावित यांच्या पार्थिवावर नवापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर नाशिकधील खासगी रुग्णाल्यात उपचार सुरू होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या निधनाची माहिती डॉक्टरांनी दिली.
माणिकराव गावित सलग ९ वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांनी १९६५ साली ग्रामपंचायतीच्या राजकारणाला सुरुवात केली होती. 1981 साली पहिल्यांदा गावित खासदार झाले होते. त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आदी पदांची जबाबदारी संभाळली आहे. ते लोकसभेचे हंगामी अध्यक्षही होते. माणिकराव गावित यांची मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार ,तर मुलगा भरत गावित भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…