वेदांता गुजरातला जाताच राज्य सरकारला खडबडून जाग ; हालचालींना वेग….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटलं आहे. गुजरातला हा प्रकल्प गेल्यानंतर महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झाले आहे. आता एअरबस-टाटाचा लष्करी विमानबांधणीचा महाकाय प्रकल्प हातातून निसटू नये आणि तो राज्यात येण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
संरक्षण खात्याने एअरबस डिफेन्स अॅण्ड स्पेस ऑफ स्पेनसोबत २२ हजार कोटी रुपयांच्या ‘५६ सी-२९५’ या मध्यम आकाराच्या वाहतूक विमान खरेदीसाठी करार केला आहे. ही विमाने विद्यमान ‘एव्हरो ७४८’ विमानांची जागा घेतील. या करारानुसार तयार १६ विमाने ४८ महिन्यांत दिली जाणार आहेत. तर ४० विमाने भारतात बनवली जाणार आहेत. या विमाननिर्मितीसाठी एअरबस डिफेन्स अॅण्ड स्पेस व टाटा अॅडवान्स सिस्टीम लिमिटेडसोबत १० वर्षांचे कंत्राट केले आहे. हा महत्त्वाचा प्रकल्प मिळण्यासाठी उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश प्रयत्नशील आहेत.
उद्योग खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राने संरक्षण क्षेत्रनिर्मितीत मोठी आघाडी घेतली आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद व अहमदनगरला कारखाने आहेत. तर नागपूर हे हवाई क्षेत्राचे प्रमुख ठिकाण म्हणून उदयास येत आहे. बोईंग, सोलार इंडस्ट्रीज व ब्रह्मोस एअरोस्पेस आदी कंपन्या येथे आल्या आहेत. नागपूर जवळचा ‘मिहान’ प्रकल्प विमान क्षेत्राशी संबंधित प्रकल्पासाठी आदर्श आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र पुढे आहे.
उद्योगाचा आकार, स्थळ व रोजगारनिर्मितीवर यावरून पॅकेज ठरवण्यात आले आहे. संरक्षण व हवाई क्षेत्रासाठी आवश्यक त्या सर्व सोयी असलेले महाराष्ट्र हे उत्तम राज्य आहे. राज्य सरकारने २०१९मध्ये संरक्षण व हवाई क्षेत्रासाठी धोरण केले. उत्पादक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी सरकारने धोरण आखले आहे.
हा महत्त्वाचा प्रकल्प राज्यात येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…