बच्चू कडूंना कोर्टाकडून अंतरीम जामिन मंजूर ; पुढील सुनावणी 21 सप्टेंबरला होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे माजी राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना 2016 मध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात गिरगाव कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर, त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
त्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली असून बच्चू कडू यांच्यावतीने मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे.
मुंबई सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता. 30 मार्च 2016 ला दुपारी दीडच्या सुमारास मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मंत्रालयातील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलनही केले होते. कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा तेव्हा सरकारी अधिकारी संघटनांनी दिला होता.
मुंबई सत्र न्यायालयाचा बच्चू कडू यांना अंतरिम जामिन मंजूर झाला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आज संध्याकाळी बच्चू कडूंची सुटका होणार आहे. मात्र नियमित जामिनावर पुढील सुनावणी 21 सप्टेंबर रोजी मुंबई सत्र न्यायालयात होणार आहे.
बच्चू कडू यांनी या अगोदर देखील अनेकदा उग्र स्वरूपाची अनेक आंदोलन केले होती. त्या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर अनेक पोलीस स्टेशनला गुन्हे देखील दाखल आहेत. प्रहार संघटना ही आंदोलनांकरिता लोकप्रिय आहे. बेकायदा काम करून घेण्यासाठी कडू हे गावित (bhaurao gavit) यांच्यावर दबाव आणत होते, असा आरोप महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेने केला होता. या घटनेकडे काँग्रेसचे सदस्य सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे, असे तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितलं होतं. मात्र, आपण त्या अधिकाऱ्यास मारहाण केली नसल्याचा दावा कडू यांनी केला होता. अखेर, संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
आता पुढे काय होऊ शकतं ? गिरगांव कोर्टाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गिरगाव कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता बच्चू कडू यांचे वकील सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज सादर करतील, अशी माहिती आहे. सेशन कोर्टात बच्चू कडू यांना जामीन मिळू शकतो. अस देखील सांगण्यात आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…