अधिकाऱ्यांशी राडा भोवला ; बच्चू कडू यांना पोलिसांनी घेतले ताब्यात ; नेमकं प्रकरण काय…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 14 सप्टेंबर :- प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू आणि अधिकाऱ्यांचा वाद सर्वश्रुत आहे. मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांसोबत वाद घालण्याप्रकरणी गिरगांव कोर्टाने बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी बच्चू कडूंना ताब्यात घेतले असून वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन गेले आहे. सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता. या प्रकरणी आज बच्चू कडू गिरगांव कोर्टात हजर झाले. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
मरीन लाईन पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेतलं असून वैद्यकीय चाचणीसाठी रवाना झाले आहे. जेजे रुग्णालयामध्ये त्यांना घेऊन जाणार आहे.
दरम्यान, बच्चू कडू न्यायालयीन कोठडी प्रकरणामध्ये गिरगांव कोर्ट न्यायाधीश पटेल यांनी आपले विशेषाधिकार वापरण्यास नकार दिला. हे अधिकार वापरून त्यांना जामीन मंजूर करता आला असता,.
मात्र,सेशन कोर्टात त्यांनी केस हस्तांतरीत केली आहे. आता काय होऊ शकतं ? गिरगांव कोर्ट न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली. आता बच्चू कडू यांचे वकील सेशन कोर्टात,जामिनासाठी अर्ज सादर करतील. सेशन कोर्टामध्ये बच्चू कडू यांना जामीन मिळू शकतो.
काय आहे प्रकरण ?
30 मार्च 2016 रोजी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता, 30 मार्च 2016ला दुपारी दीडच्या सुमारास मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता, मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मंत्रालयातील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलनही केले होते. कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा तेव्हा सरकारी अधिकारी संघटनांनी दिला होता.
बेकायदा काम करून घेण्यासाठी कडू हे गावित यांच्यावर दबाव आणत होते, असा आरोप महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेने केला होता. या घटनेकडे काँग्रेसचे सदस्य सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले. ‘राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे’, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितलं होतं. मात्र आपण त्या अधिकाऱ्यास मारहाण केली नसल्याचा दावा कडू यांनी केला होता. अखेर,संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे, मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…