मुंबई ठाणे पुण्यासह सर्वच महापालिकेत मनसेचं “एकला चलो रे” ; संदीप देशपांडे यांची मोठी घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे नेते आणि भाजप नेत्यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून फेऱ्या वाढल्या होत्या.
त्यामुळे मनसे, शिंदे गट आणि भाजपची महापालिकेत युती होईल असं सांगितलं जात होतं. त्यातच राज ठाकरे यांनी डबे जोडण्याचं काम सुरू झालंय असं विधान केलं होतं. त्यामुळे या तिन्ही पक्षांची युती होणार असल्याचं सांगितलं जात असतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईसह कोणत्याही महापालिकेत मनसे कुणाशीही युती करणार नाही. आम्ही स्वबळावर लढू आणि सर्वच्या सर्व जागा लढू, असं संदीप देशपांडे यांनी जाहीर करून युती आणि आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
आगामी काळातल्या सर्व महानगरपालिका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. राज ठाकरेंच्या आदेशानुसार सर्व जागा लढण्याची तयारी आम्ही सुरु केली आहे. या आधी देखील आम्ही स्वबळावर निवडणुका लढल्या होत्या. आम्ही मुंबईत 227 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत, असं संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.
आम्ही स्वतंत्र आहोत. सध्या आमचा कुणासोबतही न जाण्याचा निर्णय झालाय. आम्ही सर्वच महापालिका निवडणुकीत आमची ताकद आजमावणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. युती हा जर तर चा विषय आहे. आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. कुठल्याही पक्षाचा बालेकिल्ला नसतो. आमचा विदर्भाचा दौरा सुरू होतोय. पक्ष वाढीसाठी हा आमचा दौरा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…