महिलांचा सत्कार करून साजरा केला लेकीचा पहिला स्मृतिदिन ; विविध क्षेत्रातील 31 महिलांचा गौरव…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे 9370464827
दिग्रस :- समाजात विविध क्षेत्रात कार्यरत महिलांची दखल घेत त्यांचा गौरव करून आपल्या लाडक्या लेकीचा जगा वेगळा स्मृतिदिन साजरा करण्याचा आगळावेगळा आदर्श दिग्रसच्या आठवले कुटुंबाने समाजासमोर ठेवला आहे. अचानक आपल्यातून निघून गेलेल्या मुलीच्या जाण्याचे दुःख उराशी बाळगतांनाच समाजातील प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत आपलं जगणं सुसह्य करणाऱ्या महिलांच्या कष्टाची दखल घेत त्यांचा गौरव करण्याची अभिनव कल्पना आठवले कुटुंबाला सुचली. त्यानुसार वेगवेगळ्या क्षेत्रात संघर्ष करत समाजात आपलं अस्तित्व टीकवणाऱ्या महिलांची निवड हे या गौरव समारंभाचे वैशिष्ट्य ठरले! आपला आणि समाजाचा नावलौकिक सर्वदूर पोचविणाऱ्या महिलांची निवडही या गौरव पुरस्कारासाठी करण्यात आली, हे विशेष!

संविधान दिनाचे प्रणेते सदानंद आठवले आपल्या सामाजिक कार्यासाठी परिचित आहेतच. आपल्या लेकीचा पहिला स्मृतिदिन धार्मिक विधिपुरता किंवा कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता त्या दिवशी समाजातील वैशिष्ट्य पूर्ण काम करणाऱ्या महिलांचा गौरव करीत साजरा झालेला हा आगळावेगळा स्मृतिदिन दिग्रसमध्ये चर्चेचा विषय ठरला.
सार्वजनिक बांधकाम विभागात उप मुख्य कार्यकारी अभियंता पदावर असणाऱ्या कु. प्रियंका सदानंद आठवले यांचे आजारामुळे गतवर्षी आकस्मिक निधन झाले. मुलीच्या अशा अचानक जाण्याने अख्खे गाव हळहळले होते. तिच्या जाण्याचे दुःख असले तरी तिच्या स्मृती कुटुंबासह समाजात जतन करून ठेवण्याच्या विचाराने कु. प्रिंयका सदानंद आठवले मेमोरियल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. या फाउंडेशनच्या माध्यमातून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. भदन्त डॉ खेमधम्मो महाथेरो (मुळावा), भदन्त प्रा. महाथेरो सुमेध बोधी, भदन्त विजय बोधी (मोझरी) यांचे धम्म देसना आणि इतर धार्मिक विधी झाल्यानंतर महिला सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी महिलांच्या सामाजिक कार्याची माहिती विशद करून सन्मानपूवर्क गौरव पुरस्कार महिलांना बहाल करण्यात आले.
यात गुणवंत विद्यार्थिनी, युवा खेळाडूंसह पुरुषी क्षेत्रात हिंमतीने समोर येऊन भाजीविक्री, चांभारकाम, रेशन दुकान, हॉटेल, आर डी कलेक्शन, इस्त्री दुकान, घरकाम, शेती, बचत गट, वैद्यकीय सेवा, वकिली व्यवसाय करणाऱ्या महिला आणि मुलींचा समावेश होता. शिवाय शालेय पोषण आहार, साहित्य, शिक्षण, समाज सेवा करणाऱ्या महिलांना ही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला समाजातील गनमान्य व्यक्ती मोठ्या संख्येत उपस्थित होते. सत्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रियंका मेमोरियल व डॉ कलाम फोरमच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
यांना मिळाला पुरस्कार :
कु. सायली लक्ष्मण वास्कर, कु. नुपूर नितीन पद्मावार, कु. पुनम कैलास खांदवे, कु. वैष्णवी राहुल मुधोळकर, कु. भूमी सुभाष राठोड, सौ. दिक्षा निलेश मुनेश्वर, स्नेहा ढोले-दरेकर, आरती राजेश पद्मावार, वैशाली गावंडे-कोल्हे, सुनिता मारोती शिंदे (सावंगा), ज्योती चंपतराव अस्वार, कु. श्वेता हरीश सांखला, श्रीमती कुसुम हिंमत जेठवा, सौ. निता अमोज चव्हाण (आनंदवाडी), सौ. सुवर्णा सदानंद बुटले (लाख), रिना जगन मुजमुले, वंदना विलास जाधव (काटी), रंजना विश्वनाथ लोखंडे (वसंतपूर), सकुबाई मनवर (चिंचोली), रुपाली पाटील-राजूरकर, ज्ञानेश्वरी विनोद राठोड, सुधा खडस्कर, छाया जाधव, सौ. माधुरी सुदेश ढोले, प्राचार्य आबेदा बेगम, श्रीमती ज्योती नारायणराव निचत, श्रीमती रजनी गजानन आठवले (देऊरवाडा), ऍड. आरती परळकर-सवणे, डॉ. कल्पना शाम जाधव, फौजिया अंजुम अफजल बेग, सौ. लताताई प्रल्हाद उपलेंचवार (हरसूल)

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…