शिवाजी पार्क वगळलं..? ; आता “या” ठिकाणी होणार शिंदे गटाचा दसरा मेळावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेतील एकनाथ शिंदे गट यंदाचा दसरा मेळावा घेणार असल्याचं एव्हाना स्पष्ट झालं आहे. शिंदेंचा मेळावा शिवतीर्थावर होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कारण उद्धव ठाकरेंनी परवानगीसाठी अर्ज केलेला असतानाही अद्याप त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही.
पण आता शिंदे गटाच्या मेळाव्याचं ठिकाण बदलण्यात आल्याची माहिती मिळते. हा मेळावा शिवतीर्थावर नव्हे तर बीकेसीच्या मैदानावर होणार असल्याच्या शक्यतेचं पत्रकारांनी दिलं आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले आहेत. त्यामुळं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तयार झालेली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची ही परंपरा पुढे कोण सुरु ठेवणार याबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. यावरुन राजकारणही सुरु झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यासाठी दोन महिने आधीच महापालिकेकडं अर्ज दाखल केला आहे. पण त्यांना अद्याप यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही, त्यातच एकनाथ शिंदे देखील दसरा मेळावा घेणार असल्याचं एव्हाना नक्की झालं आहे. त्यामुळं शिंदेंनी दरसालप्रमाणं शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच घ्यावा अशी शिंदे गटाची तीव्र इच्छा आहे.
दरम्यान, शिवतीर्थावर शिंदे गटाचा मेळावा झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण शक्यता असल्यानं हा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा आग्रह मागे घेत बीकेसीच्या मैदानावर हा मेळावा घेण्याची तयारी सुरु असल्याचं सूत्रांनी हवाल्यानं सांगितलं जात आहे. यासंदर्भात आज शिंदे गटाची बैठकही पार पडणार आहे. या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…