राज्यभरात 2664 जनावरांना लम्पीची लागण ; आयुक्तांची महत्वाची सूचना….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात सध्या लम्पी या आजाराने थैमान घातलं असून राज्यात आजपर्यंत २६६४ जनावरे संक्रमित झाले आहेत. राज्यातील ३३८ गावांमध्ये हे रुग्ण आढळले असून आत्तापर्यंत ५ लाखापेक्षा अधिक जनावरांचे लसीकरण झाले असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.
सध्या लम्पी या आजारावरील १६ लाखाहून अधिक लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याचबरोबर अतिरिक्त ५ लाख लसी प्राप्त होणार असून पुढील आठवड्यात ५० लाख लसी उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात मार्च २०२० मध्ये देखील लम्पी या रोगाचे काही रुग्ण आढळले होते. त्यावेळी २ लाखांहून अधिक जणावरांना याची लागण झाली होती. त्यामधील फक्त १८ जनावरांना जीव गमवावा लागला होता अशी माहिती त्यांनी दिली. लम्पी चर्म रोग हा माणसांना होत नाही. तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधातून हा संक्रमित होत नाही. त्याचबरोबर म्हशीला हा रोग होत नाही त्यामुळे त्यांना लसीकरण करण्याची गरज नाही. लम्पी फक्त गाय आणि बैलाला होतो. त्यामुळे सध्या राज्यात पुढील आदेश येईपर्यंत बैल बाजार बंद राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाने दिलेले नियम पाळण्याचे अवाहन त्यांनी केले आहे.
जनावर दगावल्यास मिळणार मदत
लम्पी रोगामुळे जनावर दगावल्यास त्याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार आहे. यासंदर्भात आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तरीही काळजी घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
काय आहेत लम्पी रोगाची लक्षणे?
प्राण्याची भूक कमी होणे
ताप येणे
अंगावर सूज येणे
जर तुमच्या प्राण्याला असे काही लक्षण दिसत असतील तर लवकरात लवकर पशूसंवर्धन विभागाशी संपर्क साधा. तसेच विभागाच्या आयुक्तालयातील डॉक्टरांशी सकाळी ८ ते ६ या वेळेत टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
कुठल्या जिल्ह्यात लम्पीचे किती रुग्ण
जळगाव: ५१२
अहमदनगर: २७७
धुळे: ७९
अकोला: ६३६
पुणे: २०३
लातूर: १०२
औरंगाबाद: ३२
बीड: २३
सातारा: ५५
बुलढाणा: २३३
अमरावती: ३७८
उस्मानाबाद: ९
कोल्हापूर: २५
सांगली: २३
यवतमाळ: ९
परभणी: २०
सोलापूर: १०
वाशीम: २०
नाशिक: १०
जालना: ७
पालघर:१

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…