दोन महिने ही नाही झाले पण शिंदे-फडणवीस सरकार मधले राडे देशभर गाजू लागले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिंदे फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील आमदार वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेचे कट्टार समर्थक असणारे एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत ४० आमदारांसह भाजपसोबत जात राज्यात नवं सरकार स्थापन केले.
एकनाथ शिंदे यांनी ३० जूनला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण राज्याचे लक्ष शिंदे गटाकडे लागून राहिले आहे.
40 आमदार आणि 12 खासदार आपल्यासोबत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळेशिवसेना कुणाची? हा वाद आता सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून राखीव आहे. मात्र, शिंदे गटाकडून शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला जात आहे, तर भाजपकडून सुद्धा खरे शिवसैनिक हे आपल्यासोबत आहे, असं म्हणत आहे. दरम्यान, भाजपसोबतर सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गट वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा अधिक रंगली आहे.
प्रकाश सुर्वे वादग्रस्त वतव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात
मागील महिन्यात मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर येथील कार्यक्रमात चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
‘आपण गाफील राहायचं नाही. पण यांना यांची जागा दाखवून दिल्याशिवाय अपण गप्प बसायचं नाही. कुणाचीही दादागिरी खपवून घ्यायची नाही. कुणी अरे केलं तर त्याला कारे करा, प्रकाश सुर्वे इथं बसलाय. ठोकून काढा, हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा, दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करुन देतो मी, चिंता करु नका. आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही. पण अंगावर आला तर शिंगावर घेऊन कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवून राहा’, असं वक्तव्य असलेली आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलं होते. याची ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली होती.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व राडा
राज्यात पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व राडा पाहायला मिळाला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. यामध्ये आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे समोरासमोर आले होते. यावेळी अमोल मिटकरी यांनी, शिंदे गटातल्या शिंदे नावाच्या आमदाराने तिथे धक्काबुक्की केली, आम्हाला आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली असल्याचा आरोप केला.
तर एकनाथ शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी, आमचं पूर्ण होऊ द्यायचं, पायऱ्या मोकळ्या करायच्या असल्या. हा कुठला प्रकार.? म्हणून आम्हीही उत्तर दिलं. आम्ही कुणाला पाय लावत नाही. कुणी आम्हाला पाय लावायचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाहीत. जो येईल अंगावर त्याला घेऊ शिंगावर घेऊ अशी प्रतिक्रिया गोंधळानंतर माध्यमांसमोर दिली होती.
संतोष बागर यांची अधिकाऱ्याला मारहाण
हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी एकाला शिवीगाळ करत अरेरावी केल्याचा एक व्हीडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मगारांसाठी असलेल्या मिड डे मिल योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप करत आमदार संतोष बांगर यांनी एका उपहारगृहाची पाहणी केली. त्यावेळी तिथली परिस्थिती पाहून आमदार बांगर यांचा राग अनावर झाला. यावेळी त्यांनी शिवीगाळ करत मॅनेजरला एकदा नाही तीन वेळा अरेरावी करत कानाखाली लगावली होती. हा व्हिडीओ व्हायरल होता राज्यात नव्या वादाला तोंड फुटले होते.
सरकार आले म्हणजे काय मस्ती आली का? असा सवाल विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता.
सदा सरवणकर यांच्यावर गोळीबाराचा आरोप
गणपती विसर्जनाच्या दिवशी शुक्रवारी प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात झालेल्या वादाप्रकरणी आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या आरोपाखाली शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदयांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदा सरवणकर यांच्यासह त्यांचा मुलगा समाधान सरवणकर, संतोष तेलवणे, कुणाल वाडेकर आणि इतर पाच ते सहा इसमांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब प्रतापराव साळुंखे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…