शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे :- कृषी मंत्री अब्दुल सत्तार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नागपुरातील वनामती येथे सुरू असलेल्या ऍग्रोविजन या कार्यक्रमात उपस्थिती लावली.
या कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्य सरकारने एवढा मोठा निधी शेतकऱ्यांच्यासाठी दिला आहे व अजूनही पंचनामे करणे सुरूच आहे, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्यसरकार गंभीरपणे विचार करत आहे. त्यासाठी आम्ही एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहणार आहे आणि शेतकऱ्यांना काय समस्या येतात आणि ते का आत्महत्या सारखी टोकाची भूमिका घेतात, त्यावर काय उपयोजना करता येईल, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करु, असं कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
शेतकरी संकटात सापडल्यानंतर त्याला मदत करण्यामध्ये कुठेही फार जाचक अटी टाकु नये. त्यांना मदत करावी असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे, अशी माहितीही अब्दुल सत्तार यांनी दिली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…