खासदार नवनीत राणा गणपती विसर्जन करतांना गडूल पाण्यात गणपतीनां फेकूनच दिलं ; व्हिडिओ पाहून नागरिक संतापले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती, 10 सप्टेंबर :- आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनमधील त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
अमरावती जिल्ह्यातील गांधी नगर येथील लव्ह जिहाद प्रकरणावर खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जोरदार राडा घातला होता. आपला फोन रेकॉर्ड कसा केला, या मुद्यावरून नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली. यानंतर पोलीस पत्नी त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. नवनीत राणा यांनी माफी मागावी, अशी त्यांची मागणी आहे.
यापूर्वी हनुमान चालिसा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन त्यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता.आता गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देव-देवतांविषयी बोलणाऱ्या नवनीत राणांविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओत नवनीत राणा, पती रवी राणा आणि कार्यकर्त्यांसोबत विसर्जन करण्यासाठी जाताना दिसत आहे. मात्र ज्या पद्धतीने बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं, त्यावरुन नागरिकांनी नवनीत राणांना घेरलं आहे.
गणेश विसर्जनाची एक पद्धत असते. मात्र राणा दाम्पत्याने थेट वरुनच बाप्पाची मूर्ती ढकलून दिल्याने सांगत विरोधकांकडून त्यांवर जोरदार टीका केली जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेते अमोल मिटकरी यांनीही संताप व्यक्त केला आहे. राणा दाम्पत्याने जे काही केलं, त्यावरुन त्यांचं हिंदूत्व बेगडी आहे, असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…