लावला ‘नाही’ कोचिंग क्लास तरी मिळवला ‘फस्ट’ क्लास ; अवंतिका मिसाळचे ‘नीट’ परीक्षेत मोठे यश….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे 9370464824
दिग्रस :- येथील दिनबाई विद्यालयाची विद्यार्थिनी कु. अवंतीका ललितराव मिसाळ हिने वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ मध्ये घवघवीत यश मिळविले आहे. तिला 610 गुण मिळाले असून कोणत्याही कोचिंग क्लास शिवाय तिने हे यश मिळवले आहे, हे इथे उल्लेखनीय!
नीट आणि इतर प्रवेश परीक्षांसाठी सर्वच मुले कोचिंग क्लासेस लावतात. त्याशिवाय यश अशक्य असल्याची भावना पालकांसह विद्यार्थ्यांची देखील झाली आहे. कोचिंग क्लासेसची प्रचंड मोठी ‘इंडस्ट्री’ नांदेड, अकोला, नागपूर, लातूर मध्ये उभी झालेली दिसते. शिक्षण व्यवस्थेचं हे प्रचंड मोठं अपयश आहे. शिक्षण व्यवस्थेला समांतर असा उभा राहिलेला हा व्यवसाय शिक्षण व्यवस्थेचेच अनौरस अपत्य आहे. कोचिंग क्लासेस ही आजच्या शिक्षणाची अपरिहार्यता असून शाळा नाममात्र उरल्या आहेत. अशातही ‘अवंतीका’ सारखी आशेची बेटं अजून शाबीत असून विना कोचिंग क्लासेस यश मिळू शकतं हे तिच्या यशानं अधोरेखित केलं आहे. मेहनतीने ‘नीट’चा किल्ला सर करता येतो हे अवंतीका मिसाळने दाखवून दिले आहे.
अवंतीका ही शेतकरी कन्या असून तिचे वडील शेती करतात. सोबतच रंगाईची कामंही ते करतात. मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यांना दोन मुली असून अवंतिका ही धाकटी मुलगी आहे. ती मुळची सोयजना ता मानोरा जि वाशिम येथील असून तिने 12 वी दिग्रस येथील दिनबाई विद्यालयात तर 10 वी पर्यंतचे शिक्षण मोहणाबाई शाळेत घेतले आहे. अवंतिकाचे कुटुंब तिच्या शिक्षणासाठी दिग्रसला भाड्याने राहत होते. तिच्या या यशात तिच्या आई वडिलांचा सिंहाचा वाटा असून मुलगी डॉक्टर होणार असल्याचा मोठा आनंद असल्याचे तिची आई मीनाक्षी आणि वडील ललितराव यांनी सांगितले. अवंतिकाचे यश ग्रामीण भागातील गरीब आणि होतकरू मुलांचा आत्मविश्वास वाढविणारे असून मेहनतीने निटची लढाई जिंकता येते हे तिने दाखवून दिले आहे. अवंतिकाच्या या घवघवीत यशाबद्दल डॉ. कलाम फोरमचे अध्यक्ष फिरोज खान हाजी नूर खान, समाजसेवक अफजल बेग, संविधान दिनाचे प्रणेते सदानंद आठवले, ब्रेन ट्रस्टचे सचिन कोरडे, शिक्षक संघाचे गजानन गोटे, जीवन विमा सल्लागार अभय नानोटे, सेवा फाउंडेशनचे अरबाज धारिवाला, शिक्षक आमीन चौहान, नासिर मिर्जा यांनी तीचे अभिनंदन केले असून सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…