“भाजपकडे नेहमी मिशन असतात पण मुळ समस्यापासून ते मिसिंग” ; शिवसेनेकडून पलटवार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौरावर आहेत. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये भाष्य करत असताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
तसेच दोन्ही पक्षांनी मिळून 150 जागा जिंकण्याचं टार्गेट देखील दिलं आहे. याच टीकेवर शिवसेनेने म्हणजेच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पलटवार केला आहे.
अरविंद सावंत यांचं प्रत्युत्तरः
भाजपकडे नेहमीच कुठली ना कुठले मिशन असतात. मात्र, जनतेच्या मूळ समस्यांपासून ते मिसिंग असतात, अशी टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होईल, असेही त्यांनी यावेळी ठासून म्हटलं आहे.
आज काय लोटस मिशन, उद्या काय दुसरे मिशन, पण जे खरे प्रश्न आहेत त्यापासून ते मिसिंग असतात, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे. अनेक प्रश्न त्यातही जनतेच्या प्रश्नांपासून भाजपा दूर आहे, मराठी माणसांच्या अस्मितेपासून भाजप दूर आहे, मुंबई महापालिकेवर असलेले शिवसेनेचा भगवा झेंडा कोणीही हलवू शकत नाही, मुंबईतील जाती-पाती सर्वधर्मीय माणसे यांना मुंबईमध्ये शांतता हवी, मुंबई शहरात शिवसेनेने निर्माण केलेली व्यवस्था, दिलेल्या सुविधा हे मतदार विसरणार नाही, असेही सावंतांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईकरांना 24 तास पिण्याचे पाणी देण्याचं काम देखील शिवसेनेने केलं असल्याची आठवण सावंतांनी करून दिली.
अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला होता निशाणाः
दरम्यान, केवळ दोन जागांसाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका देऊन विश्वासघात केल्या असल्याचा आरोप शहा यांनी त्यांच्या भाषणामधून केला होता. मात्र, शिवसेनकडून या टीकेवर लगेचंच प्रतिक्रीया आली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…