ईडीच्या उत्तरानंतर संजय राऊतांना जामीन मिळणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मुंबईतल्या गोरेगाव पत्राचाळ मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊतांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाकडे अर्ज दाखल केला होता.
संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीला उत्तर देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
ईडीच्या कोठडीत असलेले संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता राऊतांच्या या जामीन अर्जावर सुनावणी होणार नसून मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला संजय राऊतांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ईडीने राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊतांना मुंबई सत्र न्यायालयाने 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ईडीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने 16 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली असून याच दिवशी राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…