अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार…? ; माणिकराव ठाकरे म्हणतात , ते तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :- महाराष्ट्रातले बडे काँग्रेस नेते अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. यात कितपत तथ्य आहे, असा प्रश्न काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना विचारण्यात आला.
त्यावेळी ते म्हणाले, अशोक चव्हाण हे तर महाराष्ट्रात काँग्रेसचे एक नंबरचे नेते आहेत. ते असा विचार करूच शकणार नाहीत. विरोधक त्यांच्याविषयी अपप्रचार करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच भारत जोडो यात्रेला आजपासून सुरुवात करत आहेत. ही यात्रा लवकर हिंगोलीत येणार आहे. यानिमित्त आज माणिकराव ठाकरे प्रशिक्षण आणि संबोधनासाठी आज हिंगोलीत आले होते.
काय म्हणाले माणिकराव ठाकरे?
अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांवर माणिकराव ठाकरे म्हणाले, ‘ काल परवाच आमची भेट झाली. दिल्लीच्या एका सभेत काँग्रेसच्या फक्त 10 लोकांना बोलण्याची संधी होती. त्यात अशोक चव्हाणांचा नंबर होता. असं हे महाराष्ट्रातलं नेतृत्व आहे.
आज राज्यातील काँग्रेसचे ते एक नंबरचे नेतृत्व आहे. दोन वेळा मुख्यमंत्री होते. प्रांताध्यक्ष होते. अशा प्रकारचा विचार ते करूच शकत नाहीत. या बातम्या विरोधी पक्षांकडून पसरवल्या जात आहेत. हा त्यांच्याविरोधातला अपप्रचार आहे, असं वक्तव्य माणिकराव ठाकरे यांनी केलं.
भाजपवर टीका
आज भाजपचं जे सरकार जनहिताचं नाही. संविधानाविरोधात आहे. संविधानानं दिलेले स्वातंत्र्याचे अधिकार संपुष्टात आणणारं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार बाजूला सारलंच पाहिजे, अशी भूमिका जनतेची आहे, असं वक्तव्य माणिकराव ठाकरे यांनी केलं.
भारत जोडो यात्रेला सुरुवात
मिशन 2024 लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही यात्रा असेल. 150 दिवसांच्या यात्रेत राहुल गांधी 12 राज्यांना भेटी देतील. हे 3570 किमी अंतर असेल.
भारत जोडो यात्रेअंतर्गत राहुल गांधींच्या महाराष्ट्रात दोन सभा होणार आहेत. त्यापैकी एक बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव/जामोद तर नांदेडमध्ये एक सभा होईल, असा अंदाज माणिकराव ठाकरे यांनी वर्तवला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…