केवळ धनुष्यबाण चिन्हावर नाहीतर शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच अधिकार… ; कारण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला वाढत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकांच्या सुनावणीला आता पुढची तारीख मिळाली आहे. यातच आता भाजपने यावर प्रतिक्रिया देत, एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे, शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे गेल्यासंदर्भात आता आरोप-प्रत्यारोप होत असून, शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेतेही यावर भाष्य करताना दिसत आहेत. भाजप नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर बोलताना, मला वाटते की, एकनाथ शिंदे यांचाच शिवसेनेवर हक्क आहे. कारण त्यांच्याकडे ४० आमदार आहेत. संपत्ती वारसा हक्काने पुढील पिढीकडे जाते. मात्र पक्षाचे तसे नसते पक्षावर कार्यकर्त्यांचाच हक्क असतो, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
पक्ष हा कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभा राहतो
कोणताही पक्ष हा कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभा राहातो, त्यामुळे पक्षावर पहिला हक्क हा कार्यकर्त्यांचा असतो. ४० आमदारांनी हिंदूत्त्वाचा विचार केला. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करून मिळवलेल्या सत्तेला लाथ मारली. मात्र, अजूनही काही लोक खुर्चीच्या प्रेमात आहेत, असा टोला मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
दरम्यान, शिवसेनेने अमित शाहांवर केलेल्या टीकेवर पलटवार करताना, वरून कीर्तन खालून तमाशा हे वक्तव्य अमित शाह यांच्यासाठी नाही तर उद्धव ठाकरेंसाठी लागू होते, अशी बोचरी टीका मुनगंटीवार यांनी केली. विजयादशमी हा आनंद वाटण्याचा दिवस आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी वाद नको म्हणून मैदान यांनाही नको आणि त्यानांही नको, यातून कदाचीत हा वाद निकाली निघू शकतो. मात्र याबाबत मनापाने निर्णय घ्यायचा आहे असेही ते म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…