बच्चू कडू मंत्रीपदांसाठी ठाम ; म्हणाले मी ताकाला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उध्दव ठाकरे सेना भवनात जितके शोभून दिसतात तितके मुख्यमंत्री म्हणून वर्षावर दिसले नाहीत असा टोला प्रहारचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेवा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
त्याचवेळी शिंदे-भाजपच्या मंत्रिमंडळात आपल्याला मंत्रीपद हवं आहे आमदार कडू यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
आमदार बच्चू कडू पुढे वोळताना म्हणाले की, उध्दव ठाकरे हे सज्जन माणूस आहेत. पक्ष प्रमुख म्हणून ते चांगले आहेत. सेना भवनात जसे ते शोभून दिसतात तसेच ते मुख्यमंत्री म्हणून वर्षावर शोभून दिसले नाहीत. खरं तर हे दुर्दैव म्हणावं लागेल असा टोलाही यावेळी आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
तर एका प्रश्नासंबधी उत्तर देताना कडू म्हणाले की, उद्धव ठाकरे खरे बोलले का शहा खरे बोलले हा संशोधनाचा विषय आहे. तो माझा विषय नाही. परंतु उद्धव ठाकरे सेना भवनावर जसे शोभून दिसले तेवढे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री म्हणून दिसले नाहीत. हे आमच्या दुर्दैवी होते असेही त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात बोलताना पुढे म्हणले की, मी राजकारणी आहे. मला मंत्री पदाची अपेक्षा आहे. मी ताकला जाऊन भांडे लपवणारा नालायक माणूस नाही असे सांगत आमदार कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रीपद हवं असे स्पष्टपणे सांगितलं आहे.
आमदार बच्चू कडू हे करमाळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमावेळी स्थानिक शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार कडू यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…