ज्या उत्साहाने आमचं सरकार पाडलं… ; सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे, 4 सप्टेंबर :- राज्याच्या राजकारणांत जून महिन्यात मोठा भूकंप झाला. शिवसेना नेते शिवसेनेत असलेले एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.
यानंतर शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शिंदे सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सातत्याने टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे – राज्यातील हे सरकार साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून ओरबाडून आणले गेले आहे.
या लोकांचा उत्साह फक्त लाल दिव्यांचाच होतात. मात्र, अडीच महिन्यात काही काम होताना दिसत नाही आहेत. ज्या उत्साहाने आमचे सरकार पाडलं गेलं त्या उत्साहाने कामे होत नाहीत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. या सरकारच्या फक्त गाठीभेटी आणि गृह भेटी सोडून फारशा काही बातम्या दिसत नाहीत.
तसेच त्यांचे जे दौरे दिसतात ते सुद्धा एक किलोमीटरच्या आतले असतात. ज्या ज्या वेळी मी टीव्ही बघते तेव्हा मला मुख्यमंत्री कुणाच्या तरी घरीच दिसतात, अशी टोमणाही सुप्रिया सुळे यांनी मांडला. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली.
पालकमंत्री नाहीत तर… आता राज्यात कुठेही पालकमंत्री नाहीत. कोरोना असो किंवा नसो विरोधी पक्षनेते अजित पवार सकाळी 6 वाजेपासून काम करत असायचे. त्यांच्यासोबत सर्व प्रशासन काम करत होते. तसेच दर शुक्रवारी त्यांच्या मॅरेथॉन मिटिंग व्हायच्या.
मात्र, आता पालकमंत्रीच नाहीत. म्हणून कामेही होताना दिसत नाहीत, अशी टिकाही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली.
राज्याला मागच्या अडीच महिन्यापासून पालकमंत्री नाही. त्यामुळे लोकांना कुठे तक्रार करावी हेच कळत नाही, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
तसेच मी गेल्या काही दिवसांपासून मंत्र्यांची वेळ मागत आहे. मात्र, मला वेळ मिळत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांची सेवा करायची नसेल. पण मंत्री फक्त कुणाच्या तरी घरी दिसत आहेत. फक्त गाठीभेटी होत आहेत. तसेच एक किलोमीटरच्या आतचा दौरा करत आहेत. हे नवलच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…