शरद पवारांच्या “त्या” आरोपावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर , म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू करत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता.
या टीकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले की, आजकाल ही फॅशन झाली आहे की तुम्ही जेव्हा कामाने कामाला उत्तर देऊ शकत नाहीत, तेव्हा अशी टीका करायची. मोदींच्या कामाचा आवाका एवढा मोठा झालाय आणि ज्या प्रकारची कामे त्यांनी केली आहेत, की त्याचे कोणतेही उत्तर हे विरोधक देऊ शकत नाही.
फडणवीस पुढे म्हणाले की, मी विरोधकांना एवढाच सल्ला देईन की मोदींनी विकासाची जी एक रेषा तयार केली आहे ती खोडण्याऐवजी तिच्याबाजूला एक त्याहून मोठी रेषा आखण्याचा प्रयत्न करा.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असू ते राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, दरवर्षी गणेशोत्सवात अमित शाह मुंबईत येतात. काही गणपतींचं ते दर्शन घेतात. लालबागचा राजा , आशिष शेलार यांच्या गणपतींचे दर्शन घ्यायला ते जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि माझ्याकडेही ते गणपती बाप्पांच्या दर्शनाला येतील. आमचे वरिष्ठ नेते येतायत तर त्यांच्यासोबत एक बैठक व्हावी अशी आम्ही विनंती केली होती. त्यासाठीही त्यांनी वेळ दिला आहे. एका शाळेचेही ते उद्घाटन करणार आहेत. याव्यतिरिक्त त्यांचा कोणताही कार्यक्रम नाही. मुंबई त्यांची जन्मभूमी आहे. मुंबईशी त्यांचे वेगळे नाते आहे, असे फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले होते शरद पवार…
शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर
करून विरोधकांना जेरीस आणण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.
पवार म्हणाले होते की, संजय राऊत सरकारविरोधात वर्तमानपत्रात लिहीत होते
म्हणून केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत त्यांना अटक केली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…