“भाजपाकडे ईडी , सीबीआय आहे तर माझ्याकडे…” ; गुजरात मध्ये सभेत केजरीवालांची भाजपावर सडकून टीका…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अहमदाबाद :- आगामी काळात गुजरातमध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाकडून गुजरातमध्ये प्रचार सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान, गुजरातमधील सभेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
भाजकाकडे ईडी आणि सीबीआय असून श्रीकृष्णाचा आशीर्वाद असल्याचा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
“भाजपाजवळ पोलीस, आर्मी, एअर फोर्स, ईडी, सीबीआय आहे. मात्र, आमच्याकडे श्रीकृष्ण आहे. आमच्याकडे त्यांचा आशीर्वाद आहे. आप पक्ष केवळ ८ वर्ष जूना पक्ष आहे. मात्र, देशभरात आम्ही आमची छाप सोडत आहोत. दोन राज्यात आमची सरकार आहे. आता गुजरातमध्येही आमची सरकार बनेल” , अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
“दिल्लीत आम्ही १२ लाख मुलांना मोफत शिक्षण दिले आहे. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे. दिल्लीत आम्ही सर्वांना मोफत वैद्यकीय सुविधा देत आहोत. ज्या गरीब लोकांना मोफत सुविधा मिळत आहेत, त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला देशभरात समर्थन मिळत आहे”, असेही ते म्हणाले. जर तुम्हाला मोफत शिक्षण आणि वैद्यकी सुविधा पाहिजे असेल, तर आप पक्षाला मत द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…