मोठी बातमी : काँग्रेसला पुन्हा मोठा झटका ; शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे माजी मंत्री घेणार शपथ…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई 02 सप्टेंबर :- राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बडे नेते शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात येऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.
काँग्रेसला मोठा झटका बसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळात विस्तारात काँग्रेसचे 2 माजी मंत्री शपथ घेऊ शकतात.
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काही आमदार, काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. हे सर्व भाजपात प्रवेश करणार असल्याचंही समोर येत आहे.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी भाजपला मतदान केलं होतं. यामुळे काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. शिंदे सरकारच्या फ्लोअर टेस्टच्या वेळीही काँग्रेसचे 10 आमदार सभागृहात गैरहजर होते. यात अशोक चव्हाण यांचाही समावेश होता.
तेव्हापासूनच काँग्रेस आमदारांच्या नाराजीबाबतचं वृत्त समोर येत होतं.
अशातच आता काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसणार असल्याचं समोर येत आहे. काँग्रेस पक्षाला मागील काही वर्षांपासून झटक्यांवर झटके बसत आहेत. नुकतंच गुलाम नबी आझाद यांनीही राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला. काँग्रेसने भारत जोडो यात्रा करण्याआधी काँग्रेस जोडण्यासाठी काम करायला हवं, असं त्यांनी राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं होतं. आता आझाद यांचा हा सल्ला अगदी खरं असल्याचं आणखी एका बातमीमुळे सिद्ध झालं आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…