उद्धव ठाकरे पेक्षा आम्हाला अधिक प्रतिसाद ; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच वक्तव्य….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या प्रतिसादापेक्षा आम्हाला मिळणारा प्रतिसाद अधिक असल्याचा दावा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा दृष्य परिणाम पुढच्या महिना-दोन महिन्यात दिसायला लागेल असंही ते म्हणाले. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अकोल्यात आले असता प्रसारमाध्यांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान सत्तार हे आज कृषी विद्यापीठ आणि महाबीजचा आढावा घेण्यासाठी बैठका देखील घेणार आहेत.
अमोल मिटकरींना चांगल्या डॉक्टराकडे नेऊन तपासावं लागेल
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज कृषी विद्यापीठ आणि महाबीजचा आढावा घेण्यासाठी बैठका देखील घेणार आहेत. सरकार लवकरच शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखणार असल्याचे देकील सत्तार यांनी म्हटलं आहे. यासाठीच 100 दिवसांचा कार्यक्रम ठरवल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच शिंदे-फडणवीस सरकारचा दृष्य परिणाम पुढच्या महिना-दोन महिन्यात दिसायला लागेल असं वक्तव्य देखील सत्तारांनी केलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर देखील सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली.
अमोल मिटकरी यांना चांगल्या डॉक्टराकडे नेऊन तपासावं लागेल. मग त्यांच्यात काय फॉल्ट आहे ते समजेल असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला. भाजप नेते आणि राज ठाकरेंच्या वाढत्या गाठीभेटींवर भाष्य करणं मात्र, सत्तारांनी टाळलं.
संजय शिरसाट यांच्याबद्दल अफवा
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याबद्दल भाजप डबल गेम करत आहे असा प्रश्न सत्तार यांना यावेळी विचारण्यात आला. यावेळी सत्तार म्हणाले की, कोणीही कोणाशी डबल गेम करत नाही. संजय शिरसाट औरंगाबाद जिल्ह्याचे ज्येष्ठ आमदार आहे. त्यांच्याबद्दल अफवा उडवण्याचे काम काहीजण करत आहेत. ते चांगले आमदार आहेत. चांगले काम करत आहेत, त्यांना बदनाम करण्याचे काम जर कोण करत असतील तर त्यांना ते उत्तर देतील असे सत्तार म्हणाले.
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाला कालपासून सुरूवात झाली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल संपूर्ण दिवस शेकऱ्यांसाठी दिला. त्यांच्यासोबत काम पाहिलं, अडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्यांना शेती करताना काय अडचणी येतात? शेतकरी आत्महत्या करण्याच्या मार्ग का निवडतो? या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात अब्दुल सत्तार यांनी केली आहे. विदर्भातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या मेळघाटातून अब्दुल सत्तार यांनी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाची सुरुवात केली. अमरावती जिल्ह्यातील साद्राबाडी या गावात शैलेंद्र सालकर यांच्याकडे ते मुक्कामी राहिले होते. त्यानंतर आज लेगच सत्तार हे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…