भाजप आमदारांच्या गैरहजेरीत केजरीवाल सरकारनं सिध्द केलं बहुमत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दिल्ली विधानसभेत ‘आप’नं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
दिल्ली विधानसभेत (Delhi Vidhan Sabha) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी आणलेला विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आलाय.
भाजप आमदारांच्या (BJP MLA) गैरहजेरीत 58 ‘आप’ आमदारांनी केजरीवालांच्या समर्थनार्थ मतदान केलं, तर विरोधात एकही मत पडलं नाही.
दिल्ली विधानसभेत ‘आप’नं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. मतांच्या विभाजनातून प्रस्ताव पार पडला. आमदारांना उभं करून मतमोजणी करण्यात आली. यावेळी 59 आमदार उपस्थित होते.
विरोधक सभागृहात उपस्थित नसल्यानं त्यांच्या बाजूनं शून्य मतं पडली. ‘आप’च्या तीन आमदारांपैकी एक आमदार सत्येंद्र जैन तुरुंगात आहेत. विधानसभेचे आणखी एक आमदार राम निवास गोयल हे परदेश दौऱ्यावर आहेत, तर नरेश बाल्यान ऑस्ट्रेलियाला गेले आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…