शिवसेने सोबत आता मराठा ताकद ; संभाजी ब्रिगेड च्या पाठोपाठ आणखी एक संघटनेचा पाठिंबा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई 01 सप्टेंबर :- शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर नव्याने मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच संभाजी ब्रिगेडने (sambhaji brigade) सेनेसोबत युती केली आहे.
आता संभाजी ब्रिगेड पाठोपाठ शिवसेनेला मराठा सेवा संघाचा देखील पाठिंबा मिळाला आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यातील युतीनंतर आता संभाजी ब्रिगेडची मातृ संस्था असणाऱ्या मराठा सेवा संघाने देखील या युतीला पाठिंबा दिला आहे. राज्यात शिवसेना व संभाजी ब्रिगेडची सत्ता आणणार असल्याचे सांगत मराठा सेवा सांगता मोठे फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पुढील काळात मराठा सेवा संघाची जबाबदारी 40 वर्षाच्या आतील व शासकीय सेवेमध्ये उच्च पदस्थ असणाऱ्या मराठा अधिकाऱ्यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.
केवळ 30 टक्केच जुने जाणते पदाधिकारी मराठा सेवा संघाच्या पदावर कार्यरत असणार आहेत
मराठा सेवा संघाचे राज्यभर एक कोटी सभासद तर 36 वेगवेगळे कक्ष आहेत. या सर्व कक्षात फेरबदल करण्यात येणार असून मराठा सेवा संघातचा यापुढे चेहरा तरुण असणार आहे. या फेरबदलासाठी राज्यभर मराठा सेवा संघाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या फेरबदलाच्या माध्यमातून पुढील काळात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीला मदत करून राजकीय सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मराठा सेवा संघाचा प्रयत्न असणार आहे.
आज मराठा सेवा संघाचा 32 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तने मराठा सेवा संघ आपला नवीन चेहरा घेऊन येत असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे संस्थपक कार्यदयक्ष अर्जुन तनपुरे यांनी दिली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…