विश्व पत्रकार गणेश मंडळाचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा ; दहा दिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :- पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. पत्रकारांनी मनात आणले तर काहीही होऊ शकते. याचेच प्रत्यय दिग्रस येथील पत्रकारांनी समाजाला दाखवुन दिले आहे. पत्रकारांचा स्वतंत्र गणेश मंडळ स्थापून त्याला अध्यात्मिकतेची जोड देऊन पारंपारिक पद्धतीचा ‘श्रीगणेशा’ दिग्रसच्या पत्रकारांनी केला आहे. सदर पत्रकार गणेश मंडळाकडून विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून १० दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी दिग्रसकरांना मिळणार आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या दिवशी तहसीलदार, मुख्याधिकारी, ठाणेदार, आरोग्य अधिकारी यांच्यासोबतच विविध प्रशासकीय अधिकार्यांना श्री गणेशाच्या आरतीचे यजमानपद बहाल करण्यात आले आहे.
आज धार्मिक कार्यक्रमातही नको त्या बाबीवर अवाढव्य खर्च होताना दिसते. मात्र या बाबीला फाटा देत समाजाचेही काही देणे लागते, या उदात्त भावनेतून विश्व पत्रकार गणेश मंडळाने १० दिवस समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजाला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न आपल्या कृतीतून केला आहे. यामध्ये गुरुवार, दि. १ सप्टेंबर रोजी रनिंग स्पर्धेचे आयोजन, शुक्रवार दि. २ सप्टेंबर रोजी धनुर्विद्या स्पर्धा, शनिवार दिनांक ३ सप्टेंबरला गरीब, हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप, रविवार दि.४ सप्टेंबर रोजी गायन स्पर्धा, सोमवार दि. ५ सप्टेंबर रोजी नृत्य स्पर्धा, मंगळवार दि. ६ सप्टेंबर रोजी खुली रांगोळी स्पर्धा, बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी इनरव्हील क्लबच्या सौजन्याने संत डॉ. श्री. रामरावजी महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल अँड केअर सेंटर द्वारा मोफत आरोग्य तपासणी शिबीर, गुरुवार दि. ८ सप्टेंबर रोजी सर्व थोर महापुरुषांची वेशभूषा स्पर्धा अशा विविध भरगच्च कार्यक्रमाचा समावेश आहे.
श्री गणेश वित्सर्जनाच्या दिवशी पारंपारिक, आध्यात्मिक पद्धतीने मिरवणूक पार पडणार आहे. डिजे पद्धतीला फाटा देत विविध ट्रॅक्टरवर अनेक प्रकारच्या झाकी असणार आहे. सोबतच स्पर्धेतून निवडलेले वेशभूषेमधील बालक, वायुसेना, जलसेना व स्थलसेना या तिन्ही दलाच्या वेशभूषेतील विद्यार्थी, सोबतच गोंडवाना नृत्य, बंजारा नृत्य, वारकरी मंडळी, पारंपारिक वाद्य मिरवणूकीमध्ये राहणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन, आयोजकांनी केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…