महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा लवकरच निकाल..? ; मुंबईकरांसाठी गुड न्यूज ; काँग्रेसमध्ये भूकंप TOP बातम्या….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सरन्यायाधीश उदय उमेश लळित (CJI UU Lalit) यांनी मंगळवारी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) संविधान पीठाच्या (कॉन्सिट्यूशनल बेंच) कामकाजाबाबत रुपरेषा तयार केली आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर लवकर निर्णय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये (Maharashtra Politics) सत्तानाट्य घडल्यानंतर आता आणखी एका राज्यामध्ये सत्तासंकट ओढावलं आहे. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा लवकरच निकाल? भारताचे सरन्यायाधीश उदय उमेश लळित (CJI UU Lalit) यांनी मंगळवारी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) संविधान पीठाच्या (कॉन्सिट्यूशनल बेंच) कामकाजाबाबत रुपरेषा तयार केली आहे. या रुपरेषेनुसार संविधान पीठ प्रत्येक मंगळवारी, बुधवार आणि गुरूवारी संविधानिक वैधतेसंबंधी असलेल्या प्रकरणांची सुनावणी करणार आहे.
महाराष्ट्र आणि बिहारमध्ये (Maharashtra Politics) सत्तानाट्य घडल्यानंतर आता आणखी एका राज्यामध्ये सत्तासंकट ओढावलं आहे. झारखंडमधला (Jharkhand) सत्ताधारी पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) आणि काँग्रेसने त्यांच्या 40 आमदारांना विशेष विमानाने रायपूरला पोहोचवलं आहे.
राजापूर रिफायनरीवरून (Rajapur Refinery) शिवसेनेमध्ये (Shivsena) धूमशान सुरू आहे. बारसू, सोलगाव इथं रिफायनरी उभारणीला स्थानिक शिवसेना आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी समर्थन केल्यामुळे शिवसेना नेतृत्व नाराज आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (29 ऑगस्ट) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी पक्ष सोडताच काँग्रेसमध्ये (Congress Crisis) भूकंप आला आहे.
आझाद यांनी पक्ष सोडताच जम्मू-काश्मीरमधून (Jammu Kashmir) काँग्रेसच्या 64 नेत्यांनी मंगळवारी एकत्र पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
मुंबईत गणेश उत्साहाच्या मुहूर्तावर सिडकोने घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. सदनिका, व्यावसायिक गाळे आणि भूखंड अशी मेगा लॉटरीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…