मातोश्रीला चॅलेंज देनाऱ्या बांगरांनी आता निवडून येऊन दाखवावे ; शिवसेनेत प्रवेश करताच टारफे आणि मगर यांचे बांगर यांना थेट आव्हान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेतील बंडानंतर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे चांगलेच चर्चेत आले होते. बंडखोर आमदारांचा त्यांनी एकेरी उल्लेख तर केलाच पण त्यांना शिव्या शापही दिले.
तेच संतोष बांगर अवघ्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे गटात शामिल झाले होते. एवढेच नाहीतर त्यांनी थेट मातोश्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देणारी वक्तव्यही केली होती. कॉंग्रेसचे माजी आमदार आणि शेतकरी नेते अजित मगर यांनीच आता शिवबंधन बांधले आहे. शिवाय हातामध्ये शिवबंधन बांधताच ‘मातोश्री’ आव्हान देणारे बांगर यांनी आगामी निवडणुकीमध्ये निवडून येऊन दाखवावे असे खुले आव्हानच दिले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात शिंदे गटाला शिवसेनेने पर्याय उभा केला असून आगामी काळातच कुणाचे नेतृत्व जनता मान्य करणार हे पहावे लागणार आहे.
समविचारी नेते एकत्र, बांगरांच्या अडचणीत वाढ
कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचा स्वभाव आक्रमक आहे. शिंदे सरकार सत्तेत येताच त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेल्या धमक्या चांगल्याच चर्चेत राहिलेल्या आहेत. मात्र, आता माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर हे समविचारी नेत्यांनी हातामध्ये शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे मतदारांना एक नवा पर्याय समोर राहणार आहे. संतोष बांगर यांचा आक्रमक स्वभाव आणि गेल्या दोन महिन्यात त्यांनी वेळोवेळी बदलेली भूमिका ही जनतेला मान्य नाही. विकास कामाचा त्यांना विसर पडला असून बेताल वक्तव्यानेच ते चर्चेत राहत आहेत. याबाबत कळमनुरी मतदारसंघातील जनता जागृत असून आगामी काळात त्यांनी मातोश्रीला दिलेले आव्हान याची परतफेड तर करावीच लागेल असे टारफे यांनी सुनावले आहे.
एक माजी आमदार तर दुसरे शेतकरी नेते
शिवसेनेमध्ये एकाच दिवशी माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांनी प्रवेश केला यामागे पक्षाची वेगळी अशी धोरणे आहेत. शिवसेनेतून बंड करुन कायम टीका करणाऱ्या बांगरांना आव्हान देण्यासाठीच एक माजी आमदार आणि दुसरे शेतकरी नेते हे एकत्र आले आहेत. संतोष टारफे हे कळमनुरी मतदार संघाचे माजी आमदार आहेत तर अजित मगर हे शेतकरी नेते आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेत यांची ताकद एकवटली तर संतोष बांगर यांना ते आव्हानात्मक असेल. त्यामुळे सत्तांतर आणि त्यानंतर बांगर यांची भूमिका याकडे जनता कशी पाहतेय हे महत्वाचे आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…