राज ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच सागर बंगल्यावर भेट घेतली.
यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. माहितीनुसार, ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची असल्याची चर्चा आहे. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून कमालीची गुप्तता
शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे पुन्हा अॅक्टीव्ह झाले आहेत. नुकतेच ते पुण्यात सभासद नोंदणीसाठी पोहोचले होते. यानंतर राज ठाकरे यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास्थानी भेटीसाठी पोहोचले. या भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी कमालीची गुप्तता ठेवली होती. यामुळे या बैठकीबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. याआधी जुलै महिन्यात राज ठाकरेंवर जेव्हा नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती, तेव्हा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली होती. देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचले होते.
राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात कोणती चर्चा झाली?
एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाल्याचे समजते. ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काहीतरी मोठं आणि महत्वाचं कारण असू शकतं अशी चर्चा आहे. यापूर्वी देखील या दोघांमध्ये भेट झाली होती, मात्र त्या भेटी आधी माहिती देण्यात आली होती. मात्र या भेटी संदर्भात दोघांकडून कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती देण्यात आली नाही. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाल्यापासून गेल्या दोन महिन्यांपासून कोणाच्याही भेटीगाठी करत नव्हते, मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी स्वत: सभा घेतली. तसेच त्यांच्या दौऱ्याबाबत माहितीही दिली होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आल्याची चर्चा आहे.
भाजपशी जवळीक कायम ठेवणार?
मागच्या काही दिवसांत मनसेची भाजपसोबतची जवळीकता वाढलेली दिसत होती. मात्र आता राज ठाकरे ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्यानंतर तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर ही जवळीक कायम ठेवणार की ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी अस्मितेसह हिंदुत्वाच्या मुद्याची जोड
मराठीबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झालेली राज ठाकरे यांची मनसेने आता ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ ही घोषणा ठेवली आहे. 2014 पासून मनसेच्या राजकीय घोडदौडीला ब्रेक लागला होता. त्यानंतर मनसेनं मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला. आता मनसेच्या नव्या घोषवाक्यात मराठी अस्मितेसह हिंदुत्वाच्या मुद्याची जोड दिल्यानं मनसेची पुढची राजकीय भूमिका आता स्पष्ट झाली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…