नातवासाठी आजोबा मैदानात , शरद पवारांनी दिला भाजपाला इशारा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपाचे मोहित कंबोज हे नेहमी त्यांच्या ट्विटवरुन चर्चेत राहिलेले आहेत. यापूर्वीही सत्तांतरादरम्यानचे त्यांचे ट्विट चर्चेचा विषय ठरले होते.
तर मध्यंतरी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर कारवाईबाबतचे ट्विट केले होते. यापूर्वी त्यांनी काही नेत्यांच्या बाबतीत केलेले भाकीत खरे ठरले असून नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत हे त्याचे उदाहरण आहेत.
दरम्यान, त्यांनी नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बाबत देखील एक ट्वीट केले होते. रोहित पवार यांच्या ‘बारामती अॅग्रो’ कंपनीचा आपण अभ्यास करत असून लवकरच सविस्तर अहवाल सादर करू, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला होता. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
‘रोहित पवार यांच्याबद्दल काय होणार आहे, हे भाजपच्या नेत्यांनी आधीच सांगितलं आहे. आता असं असं होणार आहे. भाजपचे काही लोक हे विरोधकांच्या घरावर असं होणार, तसं होणार, असं सांगत आहे. असा एक गट राज्यात आहेत यांना लोकं धडा शिकवतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…