भाजपाच्या संसदीय बोर्डातून नितीन गडकरींना हटवलं , नंतर गडकरींची पहिली प्रतिक्रिया , म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- भाजपाकडून केंद्रीय संसदीय मंडळाची घोषणा करण्यात आली आहे. संसदीय मंडळामधून नितीन गडकरी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. नितीन गडकरींना भाजपाच्या संसदीय मंडळात स्थान न दिल्यावर राजकीय वर्तृळात जोरदार चर्चा झाल्याचं पहायला मिळालं.
संसदीय बोर्डातून हटवल्यानंतर भाजपा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणाचा वापर करून गरज संपल्यानंतर त्या व्यक्तीला कधीच फेकून देऊ नका” असं म्हणत त्यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
गडकरींचा उद्योजकांना सल्ला
उद्योजकांशी संवाद साधताना गडकरी यांनी रिचर्ड निक्सनचे उदाहारण देत म्हटले की, “एखादी व्यक्ती तेव्हा संपत नाही जेव्हा तो हारतो. व्यक्ती तेव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न करणे सोडून देतो. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे कधीही सोडू नका. व्यवसाय, समाजसेवा आणि राजकारण या क्षेत्रात जनसंपर्क हीच त्या व्यक्तीची खरी ताकद असते. त्यामुळे जनसंपर्क कसा वाढता राहील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे”, असेही गडकरी म्हणाले.
जे ही कोणी व्यवसायात आहेत, सामाजिक कार्यात आहेत किंवा राजकारणात आहेत, त्यांच्यासाठी इतर माणसांशी त्यांचे असलेले संबंध ही सर्वात मोठी ताकद आहे. एखाद्याचे चांगले दिवस असो वा वाईट दिवस असो, जेव्हा तुम्ही कुणाचा हात हातात घेतला असेल म्हणजेच त्या माणसाशी मैत्री केली असेल तर तो हात सोडू नका, असा सल्ली यावेळी गडकरी यांनी उपस्थित उद्योजकांना दिला.
गडकरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का?
नितीन गडकरी यांनी आपला जुना एक किस्सा देखील सांगितला. गडकरी म्हणाले “जेव्हा मी विद्यार्थी नेता होतो, तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी मला चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की मी एकवेळी विहीरीत उडी मारेल पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही”, असे गडकरी म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…