निरोप येताच संभाव्य मंत्री मुंबईकडे रवाना ; मंत्रिमंडळाचा विस्तार अंतिम टप्यात ; आज उद्या शपथविधी होण्याची शक्यता….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :
सुरत – गुवाहाटी असा दौरा करून परत आल्यानंतर राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाले. राज्यात एकनाथ शिंदे सरकार येऊन महिना लोटला. मात्र मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकले नाही. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात असताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ब्रेकिंग बातमी पुढे आली आहे.मंत्री मंडळातील विद्यमान मंत्री यांच्यावर एकमत झाले असून मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या मंत्र्यांवर चर्चा अंतिम टप्यात आली आहे.त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अवघ्या काही तासात होण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून, मुंबईतून निरोप येताच मतदारसंघात असणारे अनेक संभाव्य मंत्री मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत. काही आमदार मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी मुंबईत तळ ठोकून आहेत. तर काहींनी मतदार संघातील दौरे रद्द केलेले आहेत.
मागील महिनाभरापासून रखडलेला राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आजच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरुन परतल्यानंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी आजच रात्री किंवा उद्या सकाळी होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी गेले होते. याठिकाणी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांच्यात विस्ताराबाबत बैठक झाली. मंत्रिमंडळ विस्तार उद्या सकाळी 11 वाजता किंवा आज रात्री शपथविधी उरकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…