“राज्यात सत्तेत बसलेले सरकार किती काळ राहील सांगता येत नाही :- शरद पवार”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अजित पवारांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या विषयी बोलताना अजितदादा म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात मोठमोठे नेत्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता स्वत:ला झोकून दिले. यातून देशाला स्वातंत्र्य मिळाले या गोष्टीला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. हा क्षण आपण अतिशय आनंदाने साजरा करूया.
अजित पवार म्हणाले की, कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाही. सत्ता येते आणि जाते. राज्यात आताही सत्तेत बसलेले सत्तेवर किती काळ राहतील हे सांगता येत नाही. आगामी काळात जिल्हा परिषद, तालुकपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. ओबीसी समाजाला या निवडणुकांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासहीत इतर राजकीय पक्षाचाही प्रयत्न होता. याला सुप्रीम कोर्टात यश मिळाले. आता निवडणुका कधीही लागल्या तरी पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नाही याचा विचार सर्वांनी करायला हवा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
कोणत्याही अडचणीत काम करण्याची जिद्द बाळगा. संकटे कितीही आली, आव्हान कितीही आले तरी त्यावर निर्धाराने सामना करण्याची महाराष्ट्राची परंपरा आपण जपायची आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले, पुणेकरांनी शहरातील भाजपचा पाच वर्षाचा कारभार पाहिला आहे. तसेच मी पुण्याचा पालकमंत्री असताना जिल्ह्याला किती वेळ दिला, कोरोना काळात जिल्ह्यासाठी काय निर्णय घेतले, अर्थसंकल्पातही महाराष्ट्राला निधी देताना आपला जिल्हा म्हणून आपलेपणाची भावना असल्याने विविध विकासकामांचे निर्णय घेण्याचे काम आम्ही केले, असे अजित पवारांनी सांगितले. आज राज्यात महिना उलटूनही कोणत्याही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळत नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खातेवाटप कधी हा प्रश्न केला की ते फक्त लवकरच इतकी प्रतिक्रिया देतात, असा खोचक टोला अजितदादांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. राज्यात अनेक अडचणी आणि प्रश्न आहेत यावर निर्णय घेणार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दिल्लीतून जोवर सिग्नल मिळत नाही तोवर यांच्या हातून काहीही घडणार नाही, अशी टीकाही अजित पवार यांनी यावेळी केली.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. याविषयी बोलताना अजितदादा म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात मोठमोठे नेत्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता स्वत:ला झोकून दिले. यातून देशाला स्वातंत्र्य मिळाले या गोष्टीला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. हा क्षण आपण अतिशय आनंदाने साजरा करूया. देशातील सर्वधर्म समभाव याच भूमिकेतून आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने देशाला पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्याला करायाचे आहे. त्याला कुठेही गालबोट लागू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, असे आवाहन अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…