शिंदे गटाच्या खासदारांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- महाराष्ट्रात एकनाथ शिदें यांनी केलेल्या बंडानंतर केंद्रात देखील शिवसेना खासदारांनी वेगळा गटनेता स्थापन केल्यानंतर शिंदे गटाचे खासदार आज पहिल्यांदा गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला गेले असून त्यांनी यावेळी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीचे निवेदन शाहांना यावेळी देण्यात आले आहे.
शिवसेनेकडून देखील मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात होते, मविआ सरकारचे मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून यासाठी प्रयत्न केले जात होते. दरम्यान आता शिंदे गटाच्या खासदार देखील या मागणीचा पाठपुरावा करताना दिसत आहेत. माराठीच्या सन्मानासाठी राज्यसभेत देखील वारंवार ही मागणी पुढे केली जात होती. दरम्यान शिंदे गटाकडून केंद्र सरकारकडे ही पहिली मागणी केली जात आहे.
दरम्यान काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी (ता. १) भेट घेतली. ही भेट कशासाठी घेतली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच महिना उलटूनही शिंदे-भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. कोर्टातूनही शिंदे गटाच्या याचिकेवर निर्णय आलेला नाही. या सर्वांसंदर्भात भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…