सीएम शिंदेनी हवेतच विमान थांबविले…? ; भाषणाचा व्हिडिओ व्हायरल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातल्या राजकीय घडामोडींना महिन्याभरापासून चांगलाच वेग आलाय. या सगळ्यात जोरदार चर्चा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची. त्यांच्या सभा, दौरे, भाषणं चांगलीच गाजतायत. अशाच एका भाषणातला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
त्यावरुन नेटकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली उडवली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फोनवरुन काम करण्याची शैली तर आता राज्याच्या लक्षात आली आहे. त्याच संदर्भातला एक किस्सा मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या मालेगावमधल्या सभेत. मात्र हा किस्सा थट्टेचा विषय झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. काय म्हणतायत मुख्यमंत्री शिंदे या भाषणामध्ये? जाणून घ्या…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात की, मी विमानात बसलो होतो. लीलावती रुग्णालयात एका डॉक्टरला फोन करायचा होता. पण तो फोन लागत नव्हता. जेव्हा मी पायलटला सांगितलं की पाच मिनिटं थांब मला महत्त्वाचा फोन लावू द्या. तेव्हा त्यानं दहा मिनिटं विमान थांबवलं. माझी चर्चा झाली. आता मुख्यमंत्र्यांचं हे विमान जमिनीवरच होतं की हवेत होतं, हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.
मात्र नेटकऱ्यांनी यावरुन मुख्यमंत्री शिंदेंची चांगलीच खिल्ली उडवली आहे. कोणी मुख्यमंत्र्यांच्या बाजूने बोलतंय, तर कुणी “फेकायला सर्वांना मागे टाकलं, भाजपाच्या गोटात शांतता”, अशा कमेंट्सही केल्यात. आता खरं काय खोटं काय हे फक्त मुख्यमंत्री शिंदे आणि त्या विमानाच्या पायलटलाच माहित. पण हा व्हिडीओ मात्र व्हायरल होतोय आणि नेटकरी त्याची चांगलीच मजा घेताना दिसतायत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…