अनिल देशमुख , नवाब मलिक आणि संजय राऊत यांना एकाच गुन्ह्याखाली अटक ; ईडीचे पत्र आले समोर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 01 ऑगस्ट :- महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतरही नेत्यांच्या मागे ईडीची पिडी अजूनही कायम आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक यांनी मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.
आता पत्राचाळ प्रकरणात सुद्धा शिवसेअनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत, एकाच गुन्ह्याखाली अटक, ईडीचे पत्रक आले समोरनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे संजय राऊत यांची जेलवारी आता अटळ मानली जात आहे. भाजपवर टीकेची एकही संधी न सोडणारे शिवसेनेची बुलंद तोफ संजय राऊत अखेरीस ईडीच्या जाळ्यात सापडले आहे. पत्राचाळ प्रकरणात चौकशी अंती अटक करण्यात आली आहे.
रविवारी मध्यरात्री 12.02 वाजेच्या सुमारास राऊतांना अटक करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे. याच गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आली असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, याआधी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप झाला पण त्यांना मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.
तर लकी कम्पाऊंड प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. त्यांच्यावर सुद्धा मनी लॉड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे. मलिक आणि देशमुख हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आता संजय राऊत यांना मनी लॉड्रिंग अॅक्ट 2003 [15 of 2003] नुसार अटक केली आहे.

दरम्यान, ईडीच्या ताब्यात असलेले संजय राऊत यांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जेजे रुग्णालयात घेऊन गेले आहे. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर राऊत यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. तर दुसरीकडे, संजय राऊत अटकेनंतर मुंबईमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जवळपास २०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. १०० पोलीस ईडी कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आले आहे. तर 50 पोलीस हे जे जे हॉस्पिटलबाहेर आणि ५० पोलीस कर्मचारी हे सत्र न्यायालयात तैनात करण्यात आले आहे. तसंच 2 शिघ्रकृती दलाच्या फोर्स देखील तैनात करण्यात आल्या आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…