लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या कॉंग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन ; कामकाज उद्यापर्यंत स्थगित…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रसच्या चार खासदारांचे पावसाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे. लोसभेत सोमवारी कुटुंब न्यायालय(सुधारीत) विधेयक 2022 विचारविनिमय आणि मंजुरीसाठी सुचीबद्ध करण्यात आले आहे. हे विधेयक कायदामंत्री किरेन रिजिजू पटलावर ठेवणार आहेत. लोकसभेत नियम 193 नुसार खेळांची गरज आणि सरकारकडून उचलण्यात आलेली पावले यावर चर्चा होत आहे. राज्यसभेत सामुहिक विनाशासाठी शस्त्रास्त्रे आणि त्याच्या पुरवठा पद्धतीवर चर्चा सुरु आहे. यावेळी सदनात गोंधळ घालण्यात आला.

लोकसभेत पीठासीन राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या सदस्यांवर कारवाई केली आहे. त्यांनी नियम 374 नुसार जाणूनबुजून सभागृहात गोंधळ घालणे, अध्यक्ष पीठासमोर येत गोंधळ घालणे आणि सदनातील नियम न पाळता नियमांचा दुरुपयोग करणे ही कारणे देत त्यांनी काँग्रेसचे मणिक्कम चॅगोर, टीएन. प्रतापन, ज्यातिमणी, रम्या हरिदास यांच्यावर कारवाई केली. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. त्यानंतर सर्वसहमतीने पूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतरही गोंधळ सुरुच असल्याने कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…