उद्धव ठाकरेचा घाईगडबडीत राजीनामा , ही मोठी चूक :- पृथ्वीराज चव्हाण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसह अन्य याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात संयुक्त सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने दोन्ही पक्षांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी २९ जुलैपर्यंत मुदत दिली आहे.
तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात आज दोन्ही बाजूंनी जोरदार वादावादी झाली. न्यायालयाने सुनावणी १ ऑगस्टपर्यंत तहकूब केली असली, तरी राज्यातील सत्तेची स्थिती जैसे थेच राहावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणारे वकील कपिल सिब्बल यांनी केली. फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घाईगडबडीत राजीनामा देऊन मोठी चूक केली आहे. त्यांनी विधिमंडळात भाषण करायला हवे होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, त्यांचे मत काय होते, काय झाले, आरोप काय होते, हे सर्व सभागृहात अधिकृतपणे सांगायला हवे होते.
हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे जावे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस….
न्यायालयाच्या सुनावणीवर आम्ही निश्चितच समाधानी आहोत. कारण आमची बाजू भक्कम आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्याने मी यावर जास्त बोलणार नाही. पण हे प्रकरण घटनापीठाकडे जायचे का, असे महत्त्वाचे विधान न्यायाधीशांनी केले आहे. त्यामुळे या संदर्भात ३१ ऑगस्ट रोजी न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…