मोठी बातमी ; आता शिक्षक भरती प्रक्रिया सुद्धा एमपीएससी मार्फत होणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.शिक्षक भरतीमध्ये होणारे घोटाळे,निर्माण होणाऱ्या अडचणी यामुळे लांबणीवर पडलेली शिक्षक भरती प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी राज्यभरातून सुरू होती.याच पार्श्वभूमीवर शिक्षक भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्याच्या शिक्षण आयुक्तालायाकडून तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे.शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी शिक्षण विभागाचे विशेष प्रयत्न सुरू आहेत.जर शासनाने प्रस्तावाला मान्यता दिली तर आगामी शिक्षक भरती एमपीएससी मार्फत करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असणार आहे.
2012 नंतर शिक्षक भरती प्रक्रिया झालेली नाही. 2019 ला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 12 हजार शिक्षकांची भरती झाली होती. मात्र या पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या, अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.त्यानंतर ही शिक्षक भरती प्रक्रिया कशी राबवायची त्यानुसार एमपीएससीने भरती करावी, असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.एमपीएससीचे अधिकारी सुद्धा याबाबत सकारात्मक आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…