लोकसभेतही “शिंदेशाही” ; या निर्णयामुळे दिल्लीत तयार झाला शिंदे गट ; गटनेतेपदी राहुल शेवाळे….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली, 20 जुलै :- शिवसेनेच्या आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आता खासदारांनी वेगळा गट स्थापन करून शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. शिवसेनेच्या संसदीय पक्षाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली असून राहुल शेवाळे यांची शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मिशन दिल्ली यशस्वी केले आहे. शिवसेनेचे हे 12 खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना जाऊन भेटले आणि पत्र दिलं. या पत्रात राहुल शेवाळे यांची लोकसभेत गटनेता म्हणून तर भावना गवळी यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड व्हावी, अशी मागणी केली होती. ही मागणी आता लोकसभा अध्यक्षांनी मान्य केली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शेवाळे यांना गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोदपदी मान्यता दिल्यामुळे शिवसेनेचे उरलेले 6 खासदार अडचणीत आले आहेत. शिवसेनेच्या या 6 खासदारांना लोकसभेत भावना गवळी यांचा व्हिप मान्य करावा लागेल. या 6 खासदारांनी व्हिप मान्य केला नाही तर त्यांच्यावर कारवाईदेखील होऊ शकते. 12 जानेवारी 1988 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि जून 2019 मध्ये लोक जनशक्ती पक्षाच्या गटनेतेपदाबद्दलचा लोकसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य धरण्याचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या आधारे लोकसभेत शिवसेना गटनेतेपदी राहुल शेवाळे यांच्या नियुक्तीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे.
आता लोकसभेत शिंदे गट वेगळा स्थापन झाला आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शेवाळे यांना गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोदपदी मान्यता दिल्यामुळे शिवसेनेचे उरलेले 6 खासदार अडचणीत आले आहेत. शिवसेनेच्या या 6 खासदारांना लोकसभेत भावना गवळी यांचा व्हिप मान्य करावा लागेल.
या 6 खासदारांनी व्हिप मान्य केला नाही तर त्यांच्यावर कारवाईदेखील होऊ शकते. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्येही यावर भाष्य केलं होतं. शिवसेनेच्या सर्व 18 खासदारांना आमचा व्हिप मान्य करावा लागेल, असं शिंदे म्हणाले होते. ते 6 खासदार कोण? विनायक राऊत, अरविंद सावंत, गजानन किर्तीकर, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, राजन विचारे आणि कलाबेन डेलकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला नाही. याआधी शिवसेनेने भावना गवळी यांची प्रतोदपदावरून हकालपट्टी केली होती, तसं पत्र संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं. राजन विचारे यांची मुख्य प्रतोदपदी तर विनायक राऊत यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली, पण आता लोकसभा अध्यक्षांनी शेवाळेंना गटनेते आणि भावना गवळींना पुन्हा प्रतोद म्हणून मान्यता दिली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…