अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट ; केली “ही” मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली.

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे सर्व सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता याबाबतचे पंचनामे तत्काळ करून शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली.
त्याचप्रमाणे राज्यात ठीकठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे अनेक ठिकाणी खड्डयामुळे अपघात देखील होत आहेत त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती देखील करावी. याचबरोबर राज्यातील जनतेच्या विकासकामांना स्थगिती देऊ नये अशीही मागणी करण्यात आली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, डॉ जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंढे, दत्तात्रेय भरणे उपास्थित होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…