सर्पमित्र व स्वयंसेवी वन्यजीव रक्षक यांची नांवे नोंदणी करणे अनिवार्य…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 5 जुलै :- यवतमाळ वन विभागा अंतर्गत शासनाने नियुक्त मानद वन्यजीव रक्षक श्याम जोशी, (मो. नं. ९९६०१५६८८६) यांनी शिफारस केलेल्या सर्पमित्र व स्वयंसेवी वन्यजीव रक्षकांनी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय येथे जावून त्यांचे व त्यांच्या चमु मधील सर्व सदस्यांची नांवे नोंदणी करणे अनिवार्य आहे.
तसेच सर्पमित्रांकडून सोशल मीडिया व प्रसिध्दीच्या नादामध्ये सापांशी वा वन्यजीवांशी खेळ करणे, स्टंटबाजी करणे, असे प्रकार होतात, यात बहुतेकांचा जीव सुध्दा गेलेला आहे. तसेच साप पकडल्यानंतर नैसर्गिक अधिवासात न सोडता बंदिवासात मध्ये ठेवले जातात. तर काही सर्पमित्र साप पकडण्याचा मोबदला म्हणून नागरिकांकडून पैशाची मागणी देखील करु लागले आहेत. काही सर्पमित्रांनी सापांच्या विषाची तस्करी केल्याचे सुध्दा उघडकीस झालेले आहे. तरी याप्रकारच्या बाबी निदर्शनास आल्यास संबंधीतांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल याची सर्व सर्पमित्र यांनी नोंद घ्यावी, असे उपवनसरंक्षक आनंद रेड्डी येल्लु यांनी कळविले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…