वणी येथे 7 जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 5 जुलै :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी यांचे संयुक्त विद्यमाने 7 जुलै 2022 रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर रोजगार मेळाव्या करीता एकूण 2362 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आली आहे. सदरची रिक्तपदे ही महिंद्रा ॲण्ड महिंद्रा औरंगाबाद व पूणे, टिव्हिएस चेन सप्लाय ग्रूप, पुणे, व्हेराक इंजिनिअरींग, वाळुज, डुरेव्हॉल्स औरंगाबाद,सारा स्पिंटेक्स यवतमाळ, तिरुमला इंडस्ट्रिएल ॲण्ड अलाईड प्रा.लि. धृत ट्रान्समिशन औरंगाबाद, देवगिरी फॉरगिव्हींगस औरंगाबाद, मस्कार पिसीझन औरंगाबाद, ईशान मिनरल्स, वणी, जय ॲग्रो इंडस्ट्रिज, लोहारा यवतमाळ इत्यादी विविध नामांकित कंपण्याकडुन प्राप्त करण्यात आली असुन रोजगार मेळाव्याचे दिवशी सदर कंपनीचे अधिकारी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहे.
सदर मेळाव्यामध्ये 10वी, 12वी, आय.टि.आय., पदविकाधारक, पदवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण केलेले ईच्छुक उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहुन या संधी लाभ घेता येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदविणे करीता https://forms.gle/Us२RomwjVikPdGjw७ या गुगल लिंकचा वापर करावा व प्रत्यक्ष मेळाव्याचे ठिकाणी म्हणजेच लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे दिनांक 7 जुलै 2022 रोजी मुलाखती करीता उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…