“ज्यांच्या त्यांच्या विठ्ठल” ; मुख्यमंत्र्यांच्या घरातील फोटो सगळं काही सांगत.… ; अजून ही…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, ०५ जुलै :- महाराष्ट्रात अभुतपूर्व अशा राजकीय नाट्यानंतर अखेरीस मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या खेळीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे संतापले आहे. पण, एकनाथ शिंदे आजही आम्ही शिवसेनेतच आहोत, असं वारंवार सांगत आहे. आज त्याचा प्रत्यय शिंदे यांच्या घरात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार अशी शक्यता निर्माण झाली होती.
पण, अखेरीस हा मान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळला आहे. महापूजेचं निमंत्रण देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी आले होते. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या घरात आजही मोठ्या श्रद्धेनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो अजूनही तसाच आहे. कोणत्याही शिवसैनिकाच्या घरात गेल्यावर हे दृश्य नेहमीचेच आहे, याला एकनाथ शिंदे सुद्धा अपवाद ठरले नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईची महापूजा पार पडणार आहे. विणा, विठ्ठल रखुमाईंचा फोटो, तुळसी माळी आणि टोपी घेवून समिती सदस्य मुख्यमंत्री निवासस्थानी दाखल झाले होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पूजेचं निमंत्रण दिलं आहे. १० जुलैला आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या भाषणातही उद्धव ठाकरे यांनी वारकरी आपणास महापूजेला येण्याबाबत विचारणा करत असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीतर्फे मुंबईत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महापूजेचे निमंत्रण दिले होते. पण त्यानंतर शिंदे यांनी बंड पुकारला आणि देवेंद्र फडणवीस हे महापूजा करतील अशी शक्यता निर्माण झाली होती.
पण अचानक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव आलं आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री आता विठ्ठल रखुमाईची पूजा करणार आहे. सर्वाधिक वेळा मान विलासराव देशमुखांना! आजपर्यंत सर्वाधिक वेळा या शासकीय महापूजेचा मान काँग्रेसचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे. विलासराव देशमुख यांनी एकूण ६ वेळा महापूजा केली. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येकी चार वेळा हा शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे पायी आषाढी वारी होऊ शकली नाही. त्यामुळे लाखो वारकरी पंढरपूरला जाऊ शकले नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना वारकऱ्यांशिवाय ही महापूजा करावी लागली होती.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…