सीएम एकनाथ शिंदेंना झटका ; बंडखोरी भोवली…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे नवेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नते पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. शिवसेनेचे ३९ आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदेंची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. कालच शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आजच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असे वक्तव्य केले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीचे पत्र जारी केलं आहे. तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहेत, तुम्ही स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे, त्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची नावे घेतली होती, तसेच ते शिवसेनेचेच मुख्यमंत्री असल्याचे देखील सांगत होते. त्यानंत उध्व ठाकरे यांनी मोठी कारवाई केली आहे.
ही पक्षांतर्गत कारवाई असून राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांचे नेतेपद काढण्यात येईल असे सांगण्यात येत होते मात्र तेव्हा ते कायम ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता पत्र जारी करत ही कारवाई केली आहे.

दरम्यान शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात आणखी एक याचीका करण्यात आली आहे. बहुमत चाचणी पुढे ढकलण्यात यावी यासाठी ही याचिका करण्यात आली आहे. १६ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवर सुनावणी होण्याआगोदर बहुमत चाचणी घेण्यात येऊ नये अशी शिवसेनेकडून मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती मात्र सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळली आहे. त्यामुळे आता ११ जुलै रोजीच सुनावणी होणार आहे

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…