मोठी घडामोड ; एकनाथ शिंदेची शिवसेना नेतेपदावरुन हकालपट्टी ; उद्धव ठाकरेची कारवाई…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या दहा दिवसांपासुन सुरु असलेले बंड काल एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावर येऊन थांबलेले असताना आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी कारवाई केली आहे.
शिंदे यांची शिवसेनेतील पदांवरून हकालपट्टी केली आहे.
तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेते पदावरून काढून टाकत आहे, असे पत्र उद्धव ठाकरेंनी प्रसिद्ध केले आहे.
या पत्राची एक प्रत राष्ट्रीय कार्यकारिणीला देखील देण्यात आली आहे. यामुळे शिंदे गट जो आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करत आहे, त्यांना धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंनी सकाळीच शिंदे सरकार हे शिवसेनेचे नसल्याचे म्हटले होते. शिंदे सरकारवर कुठेही शिवसेना आणि पक्षप्रमुखांचा पाठिंबा असल्याचा उल्लेख नाहीय, यामुळे हे शिवसेनेचे सरकार नाही, असे ते म्हणाले होते. उद्धव यांनी गुरुवारी, ३० जूनलाच ही कारवाई केली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…