फडणवीसांनी स्विकारला उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार ; ओबीसी आरक्षणावर घेतली बैठक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यापार्श्वभूमीवर काल शपथविधी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला.
तसेच पहिल्याच दिवशी त्यांनी तातडीनं अॅक्शन मोडमध्ये येत, ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक घेतली.
फडणवीसांनी बोलावलेल्या या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच काही भाजपचे नेते मंडळी उपस्थित होती. त्यामुळं फडणवीस पुन्हा एकदा जोमानं कामाला लागले आहेत. याद्वारे त्यांनी महाविकास आघाडीतील जे नेत्यांना जणू एक प्रकारे संदेश देण्याचं काम केलं.
विरोधीपक्षात असताना फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेतील होती. मागील मविआ सरकारमध्ये ओबीसी आरक्षणामुळं मोठा पेच निर्माण झाला होता. सुप्रीम कोर्टानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानं ते टिकवण्यासाठी मविआ सरकार कुठेतरी चाचपडताना दिसत होती. पण आता केंद्रात आणि राज्यातही भाजपच सरकार आल्यानं ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटतो का? हे पहावं लागणार आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात एक बैठक घेऊन संपूर्ण आढावा घेतला आणि पुढील कार्यवाहीसाठी निर्देश दिले.
प्रवीण दरेकर,डॉ. संजय कुटे,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…