उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या तारीख जाहीर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकीची अधिसूचना 5 जुलै रोजी जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यासाठी 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. आयोगाने निवडणुकीसाठी 6 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे.

याआधी राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. एनडीएने महिला आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली आहे. तर विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना संयुक्त उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येत्या 22 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणार आहे.
व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपती म्हणून कार्यकाळ 10 ऑगस्ट 2022 रोजी संपत आहे. घटनेच्या कलम 68 नुसार उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी या पदासाठी निवडणूक घेणे आवश्यक आहे. बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…